- अविनाश साबापुरे
यवतमाळ - महाराष्ट्र दिनी शाळांचा निकाल देण्यासाठी राज्यभरातील शिक्षक गेले आठवडाभर पेपर तपासणीत व्यग्र होते. पण १२ जि.प शाळांनी हेच काम झटक्यात केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्ध्या सर्व पेपर तपासून घेतले अन् अचूक निकालही लावला. एक पेपर एआयने अवघ्या अर्ध्या मिनिटात तपासला.