

Vardha News
esakal
सेलू: भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या हिंगणी येथील ग्राममाता ''आई माता माय'' मंदिराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. ज्या दैवतासमोर गावकरी नतमस्तक होतात, जिथे संकटकाळी साकडे घातले जाते, त्याच मंदिर परिसराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आजूबाजूच्या काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आणि साचलेल्या घाणीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो आहे.