Akola 40 thousand farmers deprived of debt relief !, only 70 thousand 797 farmers across the district got the benefit of the scheme
Akola 40 thousand farmers deprived of debt relief !, only 70 thousand 797 farmers across the district got the benefit of the scheme

40 हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित!, जिल्हाभरातील केवळ 70 हजार 797 शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ

Published on

अकोला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ ७० हजार ७९७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अजूनही चाळीस हजाराहून अधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

नैसर्गिक, अनैसर्गिक समस्यांनी वेढलेल्या आणि आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्जमुक्ती देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर अल्पावधीतच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून, दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्यात आली. पात्र शेतकऱ्यांची खाते अपलोड करून पहिल्या टप्प्यातील पात्रता याद्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या. मात्र अजूनही जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ११ हजार ७९ पात्र शेतकऱ्यांची खाते अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ ७० हजार ७९७ शेतकऱ्यांना ४४६.०८ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून, विविध कारणांमुळे अजूनही ४० हजाराहून अधिक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. महत्वाचे म्हणजे बँकांच्या दृष्टीने हे सर्व शेतकरी थकबाकीदार ठरत असल्याने त्यांना बँकांनी सुध्दा पीक कर्ज नाकारले. त्यामुळे हे सर्व शेतकरी पीक कर्जपासून सुध्दा वंचित आहेत.

'त्या' शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्या
कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज राज्य शासनाकडून येणे दाखवून बँकांनी त्यांना खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज द्यावे, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. शिवाय १ एप्रिल २०२० पासून कर्जाची रक्कम प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंतचे व्याज राज्य सरकार बँकांना देणार असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे थकबाकीदार राहिलेल्या शेतकऱ्यांनाही बँकांना पीक कर्ज द्यावे लागणार आहे.

२५,६०५ खात्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकांकडून एक लाख नऊ हजार ६३० पात्र शेतकऱ्यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली होती. त्यांच्यापैकी केवळ ७४ हजार ६१९ खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, अजूनही २५,६०५ खात्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com