esakal | घरी बसूनच करता येतील बॅंकांचे व्यवहार
sakal

बोलून बातमी शोधा

akola Bank transactions can be done at home

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य व केंद्र शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. काही अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यात बँकांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत बँकांनी कमीत कमी ग्राहकांना बँकेत येऊन व्यवहार करण्याची गरज भासावी म्हणून ऑनलाइन व्यवहारावर भर दिला असून, ग्राहकांना रोखीने व्यवहार टाळून युपीआय व इतर पेमेंट ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.   

घरी बसूनच करता येतील बॅंकांचे व्यवहार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य व केंद्र शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. काही अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यात बँकांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत बँकांनी कमीत कमी ग्राहकांना बँकेत येऊन व्यवहार करण्याची गरज भासावी म्हणून ऑनलाइन व्यवहारावर भर दिला असून, ग्राहकांना रोखीने व्यवहार टाळून युपीआय व इतर पेमेंट ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.   
बँकांनीही त्यांच्या सर्व शाखांमधील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांनी त्यांच्या कामाच्या वेळेत बदल केले आहेत. शिवाय काही सेवाही पुढील आदेशापर्यंत बंद केल्या आहेत. त्यात पासबूक अपडेट करणे आणि विदेशी चलन बदलून देण्याच्या व्यवहाराचा समावेश आहे.    

ग्राहकांनी या सेवांचा ऑनलाइन उपयोग करावा

  • बँकेच्या शाखांमधील गर्दी टाळण्यासाठी एम-पासबूकद्वारे ग्राहकांनी त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासून बघावी.
  • लॉनलाइन व्यवराहासाठी एनईएफटी, आटीजीएस, आयएमपीएस किंवा युपीआ ॲपचा वापर करावा.
  • अत्यावश्‍यक वस्तू खरेदी करताना ऑनलाइन देयक अदा करा. 
  • रोखीने व्यवहार टाळा, विनाकारण जास्तीची रोख रक्कम गोळा करून ठेवू नका.

बँकांच्या कामकाजाबाबत ग्राहकांना पाठविले संदेश
कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून बँकांच्या व्यवहाराबाबत शासनाने सूचविलेल्या उपाययोजनांचा अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी बँकांच्‍या व्यवहाराच्या वेळा पुढील आदेशापर्यंत बदलण्यात आल्या आहेत. झालेल्या या बदलाबाबत सर्वच बँकांनी त्यांच्या ग्राहकांना एसएमएस, ई-मेल करून माहिती दिली आहे.   

loading image