esakal | अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना!
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महानगरानंतर पातूर सारख्या तालुक्याच्या शहरात पोहचलेला कोरोना विषाणू आता गाव-खेड्यातही पोहचला आहे. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोनाची भीती वाढत चालली आहे.

अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महानगरानंतर पातूर सारख्या तालुक्याच्या शहरात पोहचलेला कोरोना विषाणू आता गाव-खेड्यातही पोहचला आहे. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोनाची भीती वाढत चालली आहे. अकोला महानगरात सुद्धा सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंत आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ४४ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्यात स्थिरावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अचानक वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. ३) आतापर्यंतचे सर्वाधिक १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंत नऊ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आठळले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. सोमवारी (ता. ४) प्राप्त ८१ अहवालांपैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आढळले असले तरी ७२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहारांसह आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. 

कृषी नगरातील पाच जण पॉझिटिव्ह
सोमवारी (ता. ४) पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी पाच जण कृषीनगर अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित चौघांपैकी प्रत्येकी एक रुग्ण कोठडी बाजार, लाल बंगला, बैदपुरा परिसरातील रहिवाशी आहेत. याव्यतिरीक्त बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथे सुद्धा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा कोरोनाग्रस्त होत असल्याची बाब समोर आली आहे. 

कोरोना रुग्णांवर दृष्टीक्षेप (सोमवार सकाळपर्यंत)

  • आज प्राप्त अहवाल - ८१
  • पॉझिटीव्ह - नऊ
  • निगेटीव्ह - ७२
loading image