esakal | 10 ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी संघटनेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana 3 days public curfew from 10th to 12th July, decision of trade association

शहरात कोरोना चा वाढता संसर्ग पाहता कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी मेहकर शहरातील व्यापारी असोसिएशनने मेहकर शहरात दिनांक शुक्रवार (ता. 10) पासून रविवार (ता. 12) पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

10 ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी संघटनेचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मेहकर (जि.बुलडाणा)   ः शहरात कोरोना चा वाढता संसर्ग पाहता कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी मेहकर शहरातील व्यापारी असोसिएशनने मेहकर शहरात दिनांक शुक्रवार (ता. 10) पासून रविवार (ता. 12) पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.


या सबंधीची व्यापारी असोसिएशन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एक बैठक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये पार पडली या बैठकीस खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड़, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तड़वी, ठाणेदार आत्माराम प्रधान, नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाड़े उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


सदर बैठकीत किराणा , कृषी केंद्र संचालक, सराफा, कपड़ा व्यापारी , मेडिकल , तसेच छोटे व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.


या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सावधानता बाळगण्यासाठी व मेहकर शहरात कोरोना ची संसर्ग चैन तोडण्यासाठी सर्वसहमति ने 3 दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत जनता कर्फ्यू ठेवण्याचे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. या आवाहनाला उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी 3 दिवस म्हणजेच 10,11,12,जुलै रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे मान्य केले या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने उघडल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत.

loading image
go to top