अरे हे काय? पोस्टमार्टमसाठी घेतले अर्भक अन् निघाली बाहुली

निखिल देशमुख
शनिवार, 11 जुलै 2020

तालुक्‍यातील बोरजवळा येथील तलावात अर्भक मृतावस्थेत सापडले असल्याची माहिती पसरताच सर्वत्र खळबळ उडाली होती. यावेळी पोलिस, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी या अर्भकाला येथील सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणले होते. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून देखील या अर्भकाचे पोस्टमार्टम सुरु करण्यात आले.

खामगाव (जि.बुलडाणा) ः तालुक्‍यातील बोरजवळा येथील तलावात अर्भक मृतावस्थेत सापडले असल्याची माहिती पसरताच सर्वत्र खळबळ उडाली होती. यावेळी पोलिस, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी या अर्भकाला येथील सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणले होते. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून देखील या अर्भकाचे पोस्टमार्टम सुरु करण्यात आले. मात्र यावेळी हे अर्भक नसून एक बाहूली असल्याचे समोर आले. या प्रकाराची दिवसभर जोरदार चर्चा सुरु होती.

खामगाव तालुक्‍यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोरजवळा येथील तलावामध्ये गुरुवारी रात्री एक मुलीच्या जातीचे अज्ञात अर्भक आढळून आले. यामुळे गावात विविध शंकांना पेव फुटला होता. अनैतिक संबंध आणि कुमारी मातेचे हे कृत्य अशा अनेक चर्चा सुरू असतानाच पिंपळगाव राजा पोस्टेचे ठाणेदार सचिन चव्हाण यांनी माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस पाटिल आणि गावातील नागरिकांच्या मदतीने सदर अर्भकाला पोस्पोस्टमार्टमसाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात आणलेल्या अर्भकाचे सामान्य रुग्णालयातील डॉक्‍टरांनीही पोस्टमार्टम सुरु केले. यावेळी बाहुल्याच्या आतील स्पंच बाहेर आल्याने हे अर्भक नसून बाळासारखे दिसणारे बाहुले असल्याचे समोर आले. यानंतर गावातील व पोलिस हा प्रकार कुणी केला याचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकाराची शहरासह तालुक्‍यात दिवसभर चर्चा सुरु होती.

 

(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola buldana Baby dolls taken for postmarking