esakal | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मलकापूर उपविभागाच्या सीमा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana borders of Malkapur sub-division are now closed to prevent the spread of corona

कोरोनाचा संसर्ग हा मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसात अधिक प्रमाणात वाढला असून, कोरोनाचा हा संसर्ग आटोक्यात आणण्यास प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मलकापूर उपविभागाच्या सीमा बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मलकापूर (जि.बुलडाणा) ः कोरोनाचा संसर्ग हा मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसात अधिक प्रमाणात वाढला असून, कोरोनाचा हा संसर्ग आटोक्यात आणण्यास प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे.

तसेच नागरिकांकडूनही कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने मलकापूर उपविभाग कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल करीत असून, जिल्ह्यात आजपर्यंत सर्वाधिक ११४ पॉझिटिव्ह रूग्ण हे मलकापूर उपविभागात निघाले असून, यापैकी ८ रूग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. मृत्यूची संख्या सुद्धा मलकापूर उपविभागात सर्वाधिक असल्याने या बाबीचे गांभिर्य लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज १ जुलै पासून ते १५ जुलैपर्यंत मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्याच्या सिमा बंद करून अनेक निर्बंध लावण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

आज दिवसभरात रस्त्यांवर गर्दी जरी दिसून आली असलीतरी दुपारनंतर मात्र रस्ते हे सुनसान झाले होते.


जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत २२६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून, त्यापैकी मलकापूर उपविभागातील मलकापूर नांदुरा, मोताळा तालुक्यामध्ये ११४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील ११ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ८ रूग्ण हे मलकापूर उपविभागातील आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल ३४ कंटेनमेंट झोन मलकापूर उपविभागात असतांना देखील उपविभागामध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढतच आहे.


मलकापूर उपविभागातील मलकापूर व नांदुरा हे रेल्वे ट्रॅकवर असून महत्वाची रेल्वे स्टेशन बरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील शहरे आहेत. बाजूच्या जळगाव जिल्ह्यातील केळीचे व्यापारी तसेच मध्यप्रदेशातील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक येथून होते. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी मलकापूर येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व ही मोठी बाजार पेठ असल्याने येथे गर्दी होत असून या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सेवा वगळून इतर बाजारपेठ २ ते ३ तास सुरू ठेवण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश तातडीने जारी करण्याचे प्रस्तावित केले होते.


या अनुषंगाने पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे अध्यक्षतेखाली मलकापूरचे आमदार राजेश एकडे, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची सभा घेण्यात येवून सदर सभेमध्ये मलकापूर बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला व तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे मार्पâत शासनास सादर करण्यात आला होता.

त्यानुसार महाराष्ट्र शासन यांचे मिशन बिगीन अगेन आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना त्यांचे अधिकार क्षेत्रात स्थानिक परिस्थिती पाहून साथरोग नियंत्रणाकरीता स्थानिक क्षेत्राकरीता आवश्यक ते निर्बंध घालण्याचे तसेच व्यक्तींचे हालचालीवर, दुकाने उघडी ठेवणे, खरेदी इत्यादीवर निर्बंध घालण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार तसेच वाचा मधील ८ चे आदेशान्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून संपूर्ण मलकापूर उपविभागाच्या सिमा बंद करून निर्बध घालण्याचे आदेश आज १ जुलै रोजी निर्गमित केले आहे.

loading image