esakal | हातात नाही छदाम.. उभा ठाकला खरीप हंगाम...
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana Farmers are worried as they will not set up banks as they are already in arrears

सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी उसनवारी किंवा खाजगी सावकाराकडून पैश्‍याची जमवाजमव केलेल्या बळीराजाला आता रासायनिक खते, फवारणीसाठीच्या औषधांची तसेच आंतरमशागतीला लागणाऱ्या खर्चाची चिंता सतावत असून, अगोदरचे कर्ज काढलेले असल्याने व ते माफ होऊ न शकल्याने बॅंकांची दारे बंद झाली आहेत. अशातच शेतीला लावण्यास पैसा उपलब्ध नसल्यामुळे येणारे उत्पन्न नगण्य येईल हे स्पष्ट दिसत असल्याने चिंतातूर शेतकरी हवालदिल झाला आहे.

हातात नाही छदाम.. उभा ठाकला खरीप हंगाम...

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा)  ः सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी उसनवारी किंवा खाजगी सावकाराकडून पैश्‍याची जमवाजमव केलेल्या बळीराजाला आता रासायनिक खते, फवारणीसाठीच्या औषधांची तसेच आंतरमशागतीला लागणाऱ्या खर्चाची चिंता सतावत असून, अगोदरचे कर्ज काढलेले असल्याने व ते माफ होऊ न शकल्याने बॅंकांची दारे बंद झाली आहेत. अशातच शेतीला लावण्यास पैसा उपलब्ध नसल्यामुळे येणारे उत्पन्न नगण्य येईल हे स्पष्ट दिसत असल्याने चिंतातूर शेतकरी हवालदिल झाला आहे.


शेतकऱ्यांचे या तारखेपासून त्या सालापर्यंतचे अमुक कर्ज टमुक वर्षी माफ करण्याच्या घोषणेत शासन धन्यता मानत असली तरी, अटी, शर्थी व निकषांच्या आधारावर होणाऱ्या कर्जमाफीत खरेच किती शेतकरी बसले व किती बसणे बाकी आहे. याचे कोणतेही भान ठेवले जात नसल्याने प्रत्येक वेळेस घोषणांच्या या कर्जमाफीनी शेतकऱ्यांनी घोर निराशाच होत आली आहे. सध्या खरीप हंगामाची पेरणी जवळपास आटोपली असून, नेहमीप्रमाणे आपण घोषणांच्या कर्जमाफीत बसणारच नाही अशा खूणगाठ बांधलेल्या अनेक शेतकऱ्यांनी नातेवाईकांकडून उसणवारी किंवा सावकाराजवळून भरमसाठ व्याजातून पैसे ओतून पेरणी उरकून घेतली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आता चिंता आहे ती पिकाला देण्यात येणाऱ्या पहिल्यावहिल्या डोसची,फवारणीची व आंतरमशागत त्यात निंदणी व डवरणी भाड्याने करणे आहे त्याची, आता अशा अवस्थेत बळीराजाचे हात पसरण्याचे मार्गही खुंटले असून बॅंकांची 'नो एन्ट्री' असल्याने आहे त्या अवस्थेतील पिकाला निसर्गाच्या हवाली करून होईल ते उत्पन्न पदरी पाळून घेण्यातच बळीराजाला धन्यता मानावी लागणार असल्याने हा वर्ग पुरता हवालदिल झाला आहे.

खरिपाचं पेरलं पण उगवलचं नाही. दुबार पेरणीचे संकट.
मागील वर्षीच्या खरिपात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बियाणे कंपन्यांच्या प्लॉटचे अतोनात नुकसान झाले होते व तेच भिजलेले प्लॉटचे बियाणे यावर्षी मार्केटमध्ये विक्रीला आणले गेल्याने जवळपास वाणांचीे उगवणक्षमता कमी आली आहे.पर्यायाने बळीराजासाठी पाऊस लवकर सुरू होऊनही दुबार पेरणीचे उभे संकट ठाकले आहे.