esakal | धोका : एका नगरसेवकासह ४२ पॉझिटिव्ह,  एकाच दिवशीतील सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

akola Danger: 42 positives, including one corporator, most positive reports in a single day

रोना विषाणू संसर्गाचा अकोल्यात उद्रेक झाला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी ४२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एका नगरसेवकाचाही समावेश आहे

धोका : एका नगरसेवकासह ४२ पॉझिटिव्ह,  एकाच दिवशीतील सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : कोरोना विषाणू संसर्गाचा अकोल्यात उद्रेक झाला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी ४२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एका नगरसेवकाचाही समावेश आहे.

एका दिवासातील हे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी प्राप्त एकूण १९१ अहवालांपैकी १४९ संशियितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या ही चाचणी वाढल्याने मोठी दिसत असली तरी अकोला शहरासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारअखेर एकूण १२८१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२६८ अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी शुक्रवार, ता.८ मेपर्यंत एकूण ११३१ अहवाल निगेटिव्ह तर १३७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. अद्याप १३ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण १२८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०८४, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०७१ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११३१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३७ आहेत. तर आजअखेर १३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.आज प्राप्त झालेल्या १९१ अहवालात १४९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ४२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

एका वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू
शुक्रवारी एका ७८ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला १ मे रोजी दाखल झाली होती. ५ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, उपचार सुरू असताना आज दुपारी तिचा मृत्यू झाला.

१११ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
आता सद्यस्थितीत १३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील बारा जण मयत आहेत. तर गुरुवारी (ता.२३ एप्रिल) सात जण व सोमवारी (ता.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (ता.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार ता.३ मे रोजी दोघांना तर बुधवार ता.६ मे रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत १११ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

या परिसरातील रुग्णांची भर
पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांपैकी २० जण बैदपूरा येथील आहेत तर मोहम्मद अली रोड, राधाकिसन प्लॉट, खैर मोहम्मद प्लॉट येथील तिघे, सराफा बाजार, अकोट फैल व जुने शहर येथील प्रत्येकी दोघे तर जुना तारफैल, गुलजार पुरा, आळशी प्लॉट, मोमिन पुरा, भगतसिंग चौक माळीपुरा, राठी मार्केट, काला चबुतरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. त्यात एका नगरसेवकाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६८२ नागरिक अलगीकरणात
शुक्रवारअखेर १२२० प्रवासी जिल्ह्यात आले आहेत. त्यापैकी ५८६ गृहअलगीकरणात व ९६ संस्थागत अलगीकरणात असे ६८२ जण अलगीकरणात आहेत. तर ४२१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ११६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.


कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल १३७
उपचार घेत असलेले १११
मृत्यू ११
आत्महत्या १
पूर्णपणे बरे झालेले १४