पावसाळा तोंडावर आला तरी अपूर्णच राहणार शहरातील विकास कामे

akola even if the rains come, the development work in the city will remain incomplete
akola even if the rains come, the development work in the city will remain incomplete
Updated on

अकोला  ः रेड झोनबाहेर जी आधीपासून सुरू होती त्याकामांना सुरू करण्यास मंजुरी मिळाली. मात्र अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत कन्टेन्मेंट झोन वाढल्याने मजुरांची वानवा आहे. त्यामुळे अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. पावसाला तोंडावर असल्याने पाऊस सुरू होण्यापूर्वी ही कामे होणे अशक्य आहे.


अकोला शहरातील अंतर्गत रस्ते आणि पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर आहेत. याशिवाय अमृत योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्या करणारा प्लँटचेही काम सुरू आहे. ही कामे महानगरपालिका हद्दतील कन्‍टेन्मेंट झोनमध्ये आहेत. त्यातच प्रतिबंधित क्षेत्राची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही काम पूर्ण होणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही.

प्रतिबंधित क्षेत्रातील मजुरांचा वावर धोकादायक
विकास कामे पूर्ण करूण घेण्यासाठी मंजुरांची आवश्‍यकता भासणार आहे. मात्र शहरातील जे प्रतिबंधित क्षेत्र आहेत, त्यात सर्वाधिक मजूर व कामगार रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रतिबंधित क्षेत्राबाहेर वावर शहरासाठी धोकादायक ठरू शकतो. संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरणारी ही असल्याने विकास कामे पूर्ण करण्याचा आग्रह म्हणजे संपूर्ण शहराला धोक्यात टाकण्यासारखे होईल.

नगरसेवकरही विरोधात
कन्टेन्मेंट झोनमधील मजुरांना इतर क्षेत्रात काम करण्याची परवानगी दिल्यास त्याचा धोका प्रतिबंधित क्षेत्राबाहेर नागरिकांनाही राहिल. संसर्ग होण्याची शक्यता वाढेल. उदाहरणच द्यायचे झाले तर शहरात सध्या मोठ्याप्रमाणावर जलवाहिन्यांना गळती लागली आहे. ही गळती दूर करण्यासाठी मजुराचा वापर आवश्‍यक आहे. मात्र एखाद्या संसर्गीत कामगाराकडून हे काम करण्यात आले तर त्याची बाधा त्या परिसरात संपूर्ण परिसरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुर्तास विकास कामे करण्याचा आग्रह नको अशी भूमिका नगरसेवकांनीही घेतली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com