Video : हे काय ? चक्क दोन पोलिसांमध्येच झाली फ्रिस्टाईल, एक होता वर्दीवर तर दुसरा सुटीवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

ळशी प्लॉट येथील एका किराणा दुकानावर सिविल ड्रेसमध्ये असलेला पोलीस आणि त्याची पत्नी किराणा घेण्यासाठी आले होते. इतक्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने गर्दी झाल्यामुळे इतर नागरिकांना हटकले तसेच  ड्रेस वर नसलेल्या पोलिसालाही हटकले. मी पण पोलीस आहे मला हटकतो का? असे म्हणून दोघांमध्ये  बाचाबाची झाली.

 

अकोला : आळशी प्लॉट येथील एका किराणा दुकानावर सिविल ड्रेसमध्ये असलेला पोलीस आणि त्याची पत्नी किराणा घेण्यासाठी आले होते. इतक्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने गर्दी झाल्यामुळे इतर नागरिकांना हटकले तसेच  ड्रेस वर नसलेल्या पोलिसालाही हटकले. मी पण पोलीस आहे मला हटकतो का? असे म्हणून दोघांमध्ये  बाचाबाची झाली.

या वेळी दोघांनी एकमेकांना धूळ चारली. ड्युटीवर असलेल्या पोलिसाला  होत असलेली बेदम मारहाण पाहून, काही वेळ नागरिक गोंधळून गेले. इतक्यात  स्थानिक नगरसेवकाने  मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पोलिस असल्याने रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने या दाम्पत्याला सोशल डिस्टनसिंग ठेवण्याची विनंती केली आणि वर्दीवर नसलेल्या पोलीस आणि वर्दीवर असलेल्या पोलिसात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. बाचाबाची विकोपाला गेल्याने त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र याचा काही उपयोग झाला नाही. या भांडणात पोलीस पत्नीने सुद्धा उडी घेतली आणि काठीने वर्दीवर असलेल्या पोलिसाला मारहाण केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola freestyle took place between two policemen, one in uniform and the other on holiday