अकोल्याची लोकसंख्या छोटी, रुग्णसंख्या मोठी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

अकोल्याच्या लोकसंख्येशी आणि बाधित रुग्णांच्या आकडेवारीशी मेळ घातला असता अकोल्यात वैद्यकीय विभागासह प्रशासनाच्या ढिसाळ आणि चलढकलावू काराभारामुळे कोरोनाला आळा घालणे कठीण होत असल्याची ओरड आता सर्वसामान्यांकडून होत आहे.

अकोला  ः राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत अकोला जिल्ह्याची लोकसंख्या कमी असूनही अकोल्यात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशीक, मालेगाव या प्रमुख शहरांच्या लोकसंख्येचा आणि तेथील बाधित रुग्णांच्या आकडेवारीचा अकोल्याच्या लोकसंख्येशी आणि बाधित रुग्णांच्या आकडेवारीशी मेळ घातला असता अकोल्यात वैद्यकीय विभागासह प्रशासनाच्या ढिसाळ आणि चलढकलावू काराभारामुळे कोरोनाला आळा घालणे कठीण होत असल्याची ओरड आता सर्वसामान्यांकडून होत आहे.

जेव्हा इतर राज्यात कोरोनाचा प्रसार होत असताना राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या पूर्व तयारीच्या जेमतेमच उपाय योजना केल्या होता. यामध्ये अकोला शहर आणि अमरावती विभागही समाविष्ट आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नागरिकाना सोशल डिस्टस्टिंगचे महत्व न सांगताच इतर बंद आणि सुरू करण्यातच प्रशासन गुंतले होते. अशातच 7 एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला आणि तेव्हापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता ही संख्या दोनशेच्या दिशेने वाटचाल करीत असून, लवकरच तो आकडाही गाठल्या जाणार आहे. मात्र, प्रश्‍न आहे तो राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अकोला शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या कमी असतानाही प्रशासनाला कोरोनावर आळा घालण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

लोकसंख्या             शहर              बाधित रुग्ण
24,20, 000                नागपूर            266
50,49,968                    पुणे                 2621
11,75,116                   औरंगाबाद      653
18, 62, 769                  नाशीक         43
2, 45,769                      मालेगाव       616
1,33,00,000                   मुंबई          14924
5, 37,149                       अकोला          186

प्रतिबंधित क्षेत्रासह इतरही परिसराची तपासणी आवश्‍यक
ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्या क्षेत्रात प्रतिबंधित करून त्या परिसरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. असे असताना मात्र, अकोल्यात दर दिवशी नव्या परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून, रोज नव्या प्रतिबंधित क्षेत्राची भर पडत आहे. आता प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच इतरही परिसरातील नागरिकांची तपासणी करून शहर कोरोनामुक्त करणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola has a small population and a large number of patients