लॉकडाउनची सुधारित वेळ शेतकऱ्यांसाठी अडचणीची

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 8 July 2020

सुधारित लॉकडाउन ची वेळ शेतकऱ्यांना शेती साठी लागणारे साहित्य, खते, औषध खरेदी करताना मोठी अडचणीची ठरू पाहत आहे. कारण ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्याची शेतात जाण्याची वेळ सकाळी 8 वाजताच्या दरम्यान असते. तर दुपार नंतर म्हणजे 4 ते 5 वाजताचे दरम्यान घरी येतात. ही वेळ पाहता खत किंवा औषध करावे तरी कधी?. असा प्रश्न निर्माण होत असल्याने याकडे पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज दिसत आहे.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) ः सुधारित लॉकडाउन ची वेळ शेतकऱ्यांना शेती साठी लागणारे साहित्य, खते, औषध खरेदी करताना मोठी अडचणीची ठरू पाहत आहे. कारण ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्याची शेतात जाण्याची वेळ सकाळी 8 वाजताच्या दरम्यान असते. तर दुपार नंतर म्हणजे 4 ते 5 वाजताचे दरम्यान घरी येतात. ही वेळ पाहता खत किंवा औषध करावे तरी कधी?. असा प्रश्न निर्माण होत असल्याने याकडे पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज दिसत आहे.

जिल्ह्यात 7 जुलै पासून कडक लॉकडाउन सुरू झाल्याने कृषी केंद्र ही अत्यावश्‍यक सेवेतून वगळण्यात आले आहेत. आता नवीन नियमावली नुसार कृषी केंद्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत खुले ठेवण्याचे स्थानिक प्रशासनाने सूचित केले आहे. वास्तविक पाहता ही वेळ शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. सद्यस्थितीत कपाशीला खते देणे कीडनाशक फवारणी चा सिझन सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ग्रामीण भागातील शेतकरी औषध अथवा खत घरी नेऊन ठेवण्या ऐवजी हातोहात दुकानातून शेतात घेऊन जातात. सकाळी शेतात गेल्यानंतर संध्याकाळी घरी येण्याची वेळ असल्याने खत किंवा औषध खरेदि कशी करावी . असा प्रश्न निर्माण होत आहे. या कडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्याच्या सोयीचा विचार करून वेळे मध्ये सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.

नवीन आलेल्या आदेशानुसार 7 जुलै पासून तालुक्‍यात दुपारी 3 नंतर फक्त मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाना सोडून कूठलेही दुकाने सुरू राहणार नाहीत.
-समाधान राठोड,तहसीलदार, संग्रामपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Improved timing of lockdown is a problem for farmers