Akola murder news
ESAKAL
अकोला : शहरातील कृषी नगर परिसरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला तंबाखू मागण्याच्या किरकोळ वादातून एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत संतोष भगवंतराव घावडे (वय अंदाजे ४१ रा. कृषी नगर, अकोला) याचा मृत्यू झाला असून आरोपी राम गिराम (वय २८) यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.