Akola Municipal Corporation Results 2026
esakal
विदर्भ
Municipal Election Results 2026 : सत्तेसाठी भाजपला मित्रपक्षाचा आधार; शिंदेसेना अन् दोन्ही राष्ट्रवादीला फटका, अकोल्यात निकालानंतरचं राजकीय समीकरण!
Akola Municipal Corporation Results 2026 : अकोला महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ४१ च्या बहुमताचा आकडा गाठण्यात तो स्वबळावर अपयशी ठरला. निकालानंतरचे सत्तागणित पाहता भाजप-शिंदे गट-अजित पवार गट या महायुतीकडे थेट बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
योगेश फरपट
अकोला : महानगरपालिकेच्या ८० जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, अपेक्षेप्रमाणे कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र सर्वाधिक ३८ जागा जिंकणाऱ्या भाजपाने मित्रपक्ष आणि काही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. निकालानंतरचे सत्तागणित पाहता भाजप-शिंदे गट-अजित पवार गट या महायुतीकडे थेट बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
