थांबलेल्या जेसीबीला दिले हे काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

माॅन्सून पूर्व कामे ही एप्रिल व मेच्या मध्यापर्यंत होणे अपेक्षित असतात. मात्र यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी कोरोना विषाणूमुळे ही कामे महानगरपालिकांना सुरू करता आली नाही. त्यामुळे जेसीबीची चाके थांबली होती. या थांबलेल्या जेसीबीला अकोला मनपाने काम देताना कंत्राटदार पद्धतीचा फाटा दिला

अकोला : मॉन्सूनपूर्व नाला सफाईची कामे महानगरपालिका यंत्रणेकडूनच करून घेण्याचा आदेश महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी दिला. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून सर्वत्र लॉकटाउन असल्याने मनपाचे टॅक्टर, जेसीबीची कामे बंद आहेत. त्यामुळे ही यंत्रणा मनपा कर्मचाऱ्यांच्याच मदतीने वापरली जाणार आहे.

 

मॉन्सूनपूर्व स्वच्छतेची कामे दरवर्षी मनपातर्फे निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांमार्फत केली जातात. झोन निहाय त्याचे नियोजन करून ही कामे केली जातात. यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच कामे ठप्प आहेत. त्यामुळे ई-निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू करण्यासाठी वेळच शिल्लक राहिला नाही. एक महिन्यात शहरातील चारही झोनमधील नाला स्वच्छतेची कामे पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे ही कामे तातडीने सुरू करणे गरजे आहे. त्यासाठी मनपाची यंत्रणाच वापरू कामे सुरू करण्याचा आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी दिला.

जेसीबीसह टॅक्टरही वापरणार
मनपाची कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची कामे वगळली तर इतर कामे ठप्प आहेत. त्यामुळे जेसीबी, टॅक्टर आदी यंत्रणा वापरून छोट्या-मोठ्या नाल्यांची स्वच्छता केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत नियोजन करून या कामांना सुरुवात केली जाणार आहे. 

कंत्राटदारांना कामे नाही
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यावर्षी नाला स्वच्छतेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविता आली नाही. आता निविदेची वेळ खावू प्रक्रिया राबविण्यासाठी वेळ नसल्याने कंत्राटदारांना कामे न देत थेट मनपा यंत्रणेकडूनही स्वच्छतेची कामे करून घेतली जाणार आहे.

 

हद्दवाढीमुळे वाढला व्याप
नाले स्वच्छता करण्यासाठी मनपाकडून चार झोन तयार करण्यात आले आहे. या झोनमध्ये हद्दवाढीनंतर वाढलेल्या 24 गावांचाही समावेश आहे. ही सर्व गावे शहराच्या सीमावर्ती भागातील असल्याने मनपावर येथील मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेचा भारही पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola municipal corporation use jcb for this work :