esakal | coronavirus : रस्त्यावरील बेघरांसाठी महापालिकेचा बेघर निवारा खुला !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Municipal homeless shelter open to street homeless!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांसाठी अकोला महापालिकेने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बेघर निवाऱ्यात आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

coronavirus : रस्त्यावरील बेघरांसाठी महापालिकेचा बेघर निवारा खुला !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांसाठी अकोला महापालिकेने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बेघर निवाऱ्यात आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

संचारबंदीमुळे अकोला शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या बेघर व भिकारी रुग्ण यांचे हाल होण्याची शक्यता आहे. बेघर व्यक्तींसाठी अकोला महानगर पालिकेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन जवळ लाडीस प्लॉट अकोट फैल अकोला येथे मनपा शाळा क्र. ६ अकोट फैल पोलिस स्टेशन समोर अकोला येथे बेघर निवारा सुरू करण्यात आला आहे. शहरातील अनेक बेघर याठिकाणी वास्तव्यास आहेत. झोपण्यास अंथरून,पांघरूण स्वच्छतेसाठी संडास, बाथरूम वीज, पाणी व आहार याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवाऱ्याचे व्यवस्थापन आशाकिरण महिला विकास संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे, अशी माहिती माहिती महापालीकेचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर यांनी दिली.


सर्व साधारण परिस्थितीत उपरोक्त व्यवस्था असूनही जागेवर पैसे व खाद्य भेटल्याने तसेच काहींच्या वाईट सवई व्यसनांमुळे अनेकदा माहिती देवूनही अजूनही काही बेघर रेल्वे स्टेशन, बस स्थानक अथवा रस्त्यावरच राहतात. मात्र संचारबंदीच्या या काळात अन्न व निवाऱ्या संदर्भात त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच हे बेघर कोरोना विषाणूमुळे स्वत: बाधित होण्याची व इतरांना लागण होण्याची शक्यता पाहता महापालिकेच्या वतीने आयुक्त संजय कापडणीस  त्यांना बेघर निवाऱ्यात वास्तव्यास राहण्यास येण्याचे आवाहन केले आहे.

तसेच शहरातील जागरूक नागरिक ,लोकप्रतिनिधी , पोलीस यांना सुद्धा असे बेघर व्यक्ती रस्त्यावर आढळल्यास त्यांनी सुद्धा वरील पत्यावर त्यांना पाठवावे व ९८८१३३१०९८, ७७०९३७७६५०, ७७०९८२०९६६, ९७६३५६१८४२ , ९०९६१८७९५३ आदी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सुद्धा आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

loading image
go to top