अकोला: बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांची चौकशी 

जीवन सोनटक्के
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राज्यभरातील पतसंस्थेच्या शाखांमध्ये घटलेल्या तक्रारी दाखल झाल्या. या बाबतीत कोतवाली पोलिसांनी पंतसस्थेच्या काही संचालकांची चौकशी केली होती. शासनाने हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सुपूर्द केले. अकोला युनिटने यामध्ये पतसंस्थेच्या महिला संचालकांची चौकशी केली असल्याची माहिती आहे.

अकोला : राज्यभरामध्ये बीएचआरच्या पतसंस्था जळगाव यांच्या लाखो ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संस्थेच्या संचालकांची राज्य गुन्हे अन्वेषण शाखा अकोला युनिटने चौकशी केल्याची माहिती आहे.

गांधी रोडवरील बिल्डिंगमध्ये असलेल्या बीएचआर पतसंस्था  गुंतवणूकदारांनी ठेवी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवले होते. दाम दुप्पट या अटीवर ठेवलेल्या ठेवींचा भरणा संबंधित गुंतवणूकदारांना करण्यात आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पतसंस्थेकडे पैसे परत मागितले.पैसे देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ होत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी सिटी कोतवाली मध्ये तक्रार दाखल केली होती. असाच प्रकार राज्यभरात घडला होता.

राज्यभरातील पतसंस्थेच्या शाखांमध्ये घटलेल्या तक्रारी दाखल झाल्या. या बाबतीत कोतवाली पोलिसांनी पंतसस्थेच्या काही संचालकांची चौकशी केली होती. शासनाने हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सुपूर्द केले. अकोला युनिटने यामध्ये पतसंस्थेच्या महिला संचालकांची चौकशी केली असल्याची माहिती आहे. या पतसंस्थेने राज्यातील हजारो ठेवीदारांचे पैसे घेतले असून ते अजून पर्यन्त परत केलेले नसल्याची माहिती आहे. अकोला पोलिसांनी पतसंस्थेची मालमत्ता जप्त केल्याचे समजते. विशेष म्हणजे अशी कारवाई, राज्यात कोठेच झाली नसल्याचे ही समजते.

Web Title: Akola news BHP co-operative society