अकाेल्यात कुपाेषणाचा बळी; दोन वर्षाच्या उपचारानंतरही बालकाचा मृत्यू

याेगेश फरपट/मुकूंद काेरडे 
रविवार, 20 ऑगस्ट 2017

या बालकाचा कुपाेषणाने मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आराेग्य विभागाच्या यंत्रणेने खुप प्रयत्न केले. मात्र त्याच्या शरिराने साथ दिली नाही. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशनच्या चमूने सुद्धा त्याला वाचवण्याचा खुप प्रयत्न केला.
- डॉ. हरि पवार, जिल्हा आराेग्य अधिकारी

अकाेला/अकाेट : जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपाेषणाने डाेके वर काढले असून अकाेट तालुक्यातील पाेपटखेड येथील स्वप्निल साेयाम या साडेतीन वर्षीय बालकाचा शुक्रवारी (ता.१८) मृत्यू झाला. दाेन वर्ष अंडरट्रिटमेंट या बालकाचा मृत्यू झाल्याने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

पाेपटखेड येथील संजय शंकर सोयाम यांचा तीन वर्षाचा मुलगा स्वप्निल हा जन्मतःच कुपाेषित होता. त्याच्यावर उपचार सुरु होते, परंतु शुक्रवारी मध्यरात्री अखेर त्याची प्राणज्याेत मालवली. संजय सोयाम यांना तीन अपत्य आहेत, त्यापैकी स्वप्निल हा सर्वात लहान मुलगा होता. मोठा मुलगा ७ वर्षाचा असून दुसरा ५ वर्षाचा आहे. साेयाम या आदिवासी कुटुंबाची हलाखीची परिस्थिति आहे. पोपटखेड आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.आशिष अकरते यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी स्वप्नीलचे जन्मतःच वजन २ किलो असल्याचे सांगितले.

तो तीव्र कुपोषणात होता. त्याच्यावर जन्मपासून उपचार सुरु होते. त्याला आंगणवाडी मधून सुद्धा पूरक आहार सुरु होता, त्यानंतरही त्याचे वजन वाढत नव्हते. त्याला १७ जुलै २०१७ रोजी सर्वाेपचार रूग्णालय आकोला येथे दाखल केले होते. आकोट ग्रामीण रुग्णालय येथील बालरोग तज्ञ इंगळे यांचेसुद्धा उपचार सुरू होते अशी माहिती दिली. विशेष म्हणजे २०१५ पासून हा बालक कुपाेषीत असल्याची कल्पना असल्याने त्याला रूग्णालयातील व्हिसीडीसी कक्षात ठेवण्यात आले हाेते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा सुद्धा झाली हाेती. त्यानंतर काही महिन्यानंतर जुलै महिन्यात ताे अकाेट ग्रामिण रूग्णालयात दाखल झाला. त्याच्या प्रकृतीत काेणतीही सुधारणा न झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्वाेपचार रूग्णालयात १७ जुलैराेजी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी ताे सात दिवस हाेता. मात्र अचानक त्याला कालपासून उलट्या सुरू झाल्या. त्याला औषधपाणी जात नव्हते. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता त्याच्या घरी त्याचा मृत्यू झाला. कुपाेषणाने हा मृत्यू झाल्याचे आराेग्य यंत्रणेने म्हटले आहे. 

या बालकाचा कुपाेषणाने मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आराेग्य विभागाच्या यंत्रणेने खुप प्रयत्न केले. मात्र त्याच्या शरिराने साथ दिली नाही. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशनच्या चमूने सुद्धा त्याला वाचवण्याचा खुप प्रयत्न केला.
- डॉ. हरि पवार, जिल्हा आराेग्य अधिकारी

बालकाच्या मृत्यू प्रकरणाची माहिती घेतली. सीडीपीआे व सरपंचाकडून माहिती घेतली. कुपाेषणाचा अहवाल अंगणवाडी सेविका यांना तयार करायला सांगितला आहे. याशिवाय या भागातील कुपाेषीत बालकांची विशेष काळजी घेणार आहाेत. 
- झिशान अहमद, विस्तार अधिकारी (सांखिकी)

Web Title: Akola news boy dead on malnutrition