esakal | ‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

tree plantation

फलकही गायब 
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते वृक्षाराेपण केलेल्या उपक्रमाचा नामफलकही याठिकाणाहून गायब झालेला आहे. शिवाय थातूरमातूर सिमेंटचा आेटा बांधून ‘इव्हेंट’ केल्याचा प्रकार याबाबतीत घडला आहे. त्यामुळे जिल्हयात झालेल्या वृक्षाराेपणाची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला

sakal_logo
By
याेगेश फरपट

अकाेला - स्व. गाेपीनाथ मुंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ३ जून २०१५ राेजी पर्यावरण सप्ताहाच्या शुभांरभानिमित्त तालुक्यातील घुसर येथे मुख्यमंत्र्यांनी लावलेले पिंपळाचे राेपटे बकरीने खाल्ले आहे. दस्तरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राेपट्याची निगा राखण्यात वनविभाग नापास झाला आहे. आश्चर्याची बाब ही की, मुख्यमंत्र्यांचे पिंपळाचे झाड वगळता या मार्गावर दुतर्फा लावलेल्या एकाही झाडाला ट्री गार्ड नसल्याने यापैकी ९० टक्के झाडांची वाढ हाेवू शकली नसल्याने सामाजिक वनिकरण विभागाचा भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यात ३ जून ते ९ जून २०१५ पर्यंत पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले हाेते. या सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुसर येथील घुसर ते सांगळुद रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करुन केला हाेता. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर उपस्थिती हाेते. सामाजिक वनीकरण विभागाकडे या माेहिमेची जबाबदारी हाेती. वृक्षाराेपण माेहिमेवर लाखाे रूपये खर्चुन आजराेजी मुख्यमंत्र्यांनी दाेन वर्षापूर्वी लावलेले राेपटे २४ महिन्यात १२ फूटही वाढू शकले नाही. वृक्षाराेपण माेहिमेसाठी लाखाे रूपये खर्चल्या गेले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पिंपळाला फक्त ट्री गार्ड लावले मात्र घुसर ते सांगळूद या सात किलाेमिटरवर करण्यात आलेल्या एकाही राेपट्याला ट्री गार्ड लावले नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

फलकही गायब 
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते वृक्षाराेपण केलेल्या उपक्रमाचा नामफलकही याठिकाणाहून गायब झालेला आहे. शिवाय थातूरमातूर सिमेंटचा आेटा बांधून ‘इव्हेंट’ केल्याचा प्रकार याबाबतीत घडला आहे. त्यामुळे जिल्हयात झालेल्या वृक्षाराेपणाची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

यावर्षी लागणार साडेसहा लाख झाडे
यावर्षी सहा लाख ४० हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे. वनविभागामार्फत दरवर्षी पाच लाख झाडे लावण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात किती झाडे जगतात हा प्रश्नच आहे. एकदा थाटात वृक्षाराेपण केले की, संबधीत लाेकप्रतिनिधी सुद्धा त्याकडे फिरकून पाहत नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.

loading image