आता कोरोनापासून सुरक्षा एका क्लिकवर

akola news now one-click security from Corona
akola news now one-click security from Corona

अकोला :  आपल्या आसपास ‘कोरोना’ पाॅजिटीव्ह व्यक्ती असेल, पण ते कळणार कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यावर आता उत्तर सापडले आहे. सरकारने ‘आरोग्य सेतू’ नावाचे अॅप तयार केले आहे. त्यावर आपल्या शेजारी कोरोनाचा रुग्ण किंवा कॅरियर जवळ येताच, मोबाइलवर सावधानतेचा इशारा मिळणार आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे ही शक्य होणार आहे.

‘कोरोना’चे संक्रमण गतीने होते, त्यावर नियंत्रण आणणे अवघड आहे, म्हणूनच त्याला रोखण्यासाठी देश लाॅकडाऊन करावा लागला. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना ‘सामाजिक अंतर’ राखण्याच्या सूचना आहेत. पण बाहेर फिरणाऱ्यांमध्ये कोणाला कोरोना झालाय, आपल्या थांबलेली व्यक्ती व्यवस्थित आहे का? हे समजू शकत नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना हा विषाणू परदेशवारी झालेल्या किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीं व्यतरिक्त इतरांना होत असेल तर हा तिसरा टप्पा धोक्याचा आहे. आपला देश तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असताना ‘आरोग्य सेतू’ हे अॅप केंद्र शासनाने सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

काय आहे अॅपमध्ये?
हे अॅप वैयक्तिक आरोग्य स्थिती कशी आहे याची माहिती देते. जर आपल्याला ‘कोरोना’चा धोका नसेल पण अस्वस्थ वाटत असेल तर रुग्णालयात न जाता फोनद्वारे किंवा व्हिडिओ काॅलद्वारे डाॅक्टरांशी संपर्क साधावा. पण धोका असेल तर चाचणी करून घ्या असा सल्ला दिला जातो. तसेच ‘कोरोना’ म्हणजे काय?, तो टाळण्यासाठी काय करावे काय करू नये याची माहिती अॅपमध्ये आहे.

असा मिळतो सावधानतेचा इशारा
हे अॅप ज्यांनी डाऊनलोड केले आहे त्यात मोबाईल क्रमांक, नाव टाकल्यानंतर हे अॅप मोबाईलमधील ब्ल्यूट्यूथ व जीपीएसवर जोडले जाते. आपली प्रकृती चांगली असल्यास त्याबाबत इतरांना कोणताही सावधानतेचा इशारा मिळत नाही. पण ‘कोरोना’ची लक्षणे असलेल्या व्यक्ती ज्याच्याकडे हे अॅप आहे, तो जवळ आल्यास त्यावरून लगेच सावध होण्याचा इशारा मोबाईलवर मिळतो. त्यामुळे अशा व्यक्तींशी संपर्क टाळून स्वतःचे संरक्षण करणे शक्य आहे.

ही माहिती भरणे अत्यावश्यक

  • लिंग, वय
  •  कफ, ताप, श्वसनाचा त्रास आहे का? की यापैकी काही नाही.
  • मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांचा त्रास, हृदयरोग आहे का?
  •  आपण परदेशात जाणून आला आहात का?
  • जर आला असेल तर स्वतःला घरात क्वारंटाइन करा, कुटुंबीयांपासून ६ फुट लांब रहा अशी सूचना दिली जाते
  •  कोरोना संक्रमित व्यक्तीशी संपर्क आला का ?
  • आला असेल तर कोरोनाचा धोका जास्त आहे.
  • १०७५ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून चाचणीची वेळ घ्या

- प्रकृती कशी त्यावरून अॅपचा कलर बदलतो. धोका जास्त असेल तर गडद केसरी, थोडा धोका असेल तर फिकट केसरी आणि धोका नसेल तर हिरव्या रंगात अॅप दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com