मालेगावात जनता कर्फ्यूला सुरु, दवाखाने व मेडिकल व्यतिरिक्त सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद

पी.एस.खिराडे
सोमवार, 13 जुलै 2020

मालेगाव शहरात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सोमावारपासून (ता.१३) सुरुवात झाली. यामध्ये शहरातील दवाखाने व मेडिकल व्यतिरिक्त सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.

मालेगाव(जि.वाशीम) : मालेगाव शहरात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सोमावारपासून (ता.१३) सुरुवात झाली. यामध्ये शहरातील दवाखाने व मेडिकल व्यतिरिक्त सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.

नगर पंचायत पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकरिता तहसीलदाराना ११ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात १३, १४ व १५ जुलै हे तीन दिवस जनता कर्फ्यू ठेवण्याची मागणी केली होती. मालेगावात १० जुलै रोजी तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर, ९ जुलै रोजी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

१० जुलै रोजी मालेगाव येथील ४२ वर्षीय व्यापाऱ्याचा कोरोनाने अकोला येथे मृत्यू झाला होता. मालेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र शहरवासी, तालुक्यातील लोक याला गांभिर्याने घेताना दिसत नाहीत.

मोटरसायकलवर तिघे-तिघे फिरतात. मास्कचा वापर करीत नाहीत. काही तर पोलिस दिसले की, मास्क लावतात. सर्व दुकानांवर रस्त्यांवर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. लोकांनी नियमांचे सक्तीने पालन केले पाहिजे यासाठी मालेगावात जनता कर्फ्यू लावण्याची मागणी लोक करीत आहेत. त्यानुसार सोमवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. १२ जुलैपासूनच पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर व मोटारसायकलवर डबल, टिबलसीट फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे सुरू आहे.

(संपादन - विवेक मेतकर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Public curfew started in Malegaon, all commercial establishments except dispensaries and medical centers closed