esakal | खामगावात आणखी तीन दिवस जनता कर्फ्यू, कोरोनाची साखळी तोडण्याचा नागरिकांचा निर्धार, स्वयंस्फू र्तीने कर्फ्यूसाठी पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Three more days of public curfew in Khamgaon, citizens decide to break the chain of corona, initiative for spontaneous curfew

शहरात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या जनता कर्फ्यूला शहरवासीयांनी उर्त्स्फुत असा प्रतिसाद दिला. मात्र दिवेसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत चालली असून, जनता कर्फ्यूू आणखी तीन दिवस वाढविण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत कोरोनाची साखळ तोडण्याचा दृढ निश्‍चय केला असल्याचे दिसून येते.

खामगावात आणखी तीन दिवस जनता कर्फ्यू, कोरोनाची साखळी तोडण्याचा नागरिकांचा निर्धार, स्वयंस्फू र्तीने कर्फ्यूसाठी पुढाकार

sakal_logo
By
निखिल देशमुख

खामगाव (जि.बुलडाणा) :  ःशहरात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या जनता कर्फ्यूला शहरवासीयांनी उर्त्स्फुत असा प्रतिसाद दिला. मात्र दिवेसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत चालली असून, जनता कर्फ्यूू आणखी तीन दिवस वाढविण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत कोरोनाची साखळ तोडण्याचा दृढ निश्‍चय केला असल्याचे दिसून येते.


देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गडद बनत चालले आहे. दररोज जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असून, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात अगोदर कोरोनामुक्त असलेल्या खामगाव तालुक्‍यात आता मात्र कोरोनाने कहर केला असून शहर कोरोना हॉंटस्पॉंट बनत चालले आहे. दररोज शहरात ते कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असून, यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे.

अकोला जिल्ल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी कोरोनाला आळा घालण्यात मात्र यश मिळताना दिसून येत नाही. शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ते जुलै पर्यंत जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला व्यापारी, मोबाईल असोसिएशन, बार असोसिएशन सह संपुर्ण शहरवासीयांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. तीनही दिवस शहर कडकडीत बंद होते. असे असले तरी शहरात मात्र कोरोना बाधित रूग्णांच्या संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे रविवारी अनेक सामाजिक संघटना, विविध समाजाचे प्रमुख व अनेक नागरिकांनी शहरात आणखी काही दिवस जनता कर्फ्यू वाढवावा अशी मागणी आ.फुंडकर व प्रशासनाकडे केली होती. याचा गांभीर्यपुर्वक विचार करून रविवारी (ता.12) स्थानिक नगर परिषदमध्ये दुपारी आमदार फुंडकर व प्रशासकीय अधिकारी व शहरातील काही नागरिकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये खामगाव शहरात आणखी तीन दिवस जनता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नांदुरा शहरात आजपासून जनता क र्फ्यू
शहरात वेगाने कोरोनाचा फैलाव होत असून, आजपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नांदुरा नगर परिषदने शहरात 13 ते 15 जुलै दरम्यान जनता कर्फ्युची घोषणा केली आहे.
या कालावधीत शहरातील मेडीकल व औषध दुकाने वगळता इतर सर्व व्यावसायिकांसाठी बंदचे आवाहन केले आहे.या कालावधीत आरोग्य सेवेव्यतीरीक्त इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत.तरी शहरव परीसरातील नागरीकांनी या जनता कर्फ्युचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व प्रशासनास मदत होईल.खामगाव शहरात टेस्टिंगची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिका चांगला प्रतिसाद दिला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आणखी उपाययोजना गरजेच्या असून सर्व प्रशासकीय अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून आणखी तीन दिवस जनता कर्फ्यू वाढविण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे.
- आकाश फुंडकर, आमदार खामगाव

(संपादन- विवेक मेतकर)