esakal | अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला ‘मुळशी पॅटर्न’
sakal

बोलून बातमी शोधा

0001.jpg

गावगुंडांची भर रस्त्यावरुन काढली मिरवणूक ः नागरिकांना त्रास द्याल तर खबरदार

अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला ‘मुळशी पॅटर्न’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः सुनिल तरडे दिग्दर्शीत आणि अभिनेता उपमेंद्र लिमये यांच्या अभिनयाने नटलेला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात पोलिस अधिकाऱ्यांनी गावगुंडाची शहरातून काढलेली मिरवणूक तुम्ही पाहली असेल. अगदीच या चित्रपटातील कथेला साजेशी कारवाई अकोला पोलिसांनी शनिवारी (ता.18) केली आहे. चक्क शहरातील मुख्य रस्त्यावरून गावगुंडाची धिंड काढीत गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील यावलखेड, धोतर्डी, दहीगाव भागात अकोल्यातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. दरम्यान, पोलिस असल्याचे सांगत नागरिकांना मारहाण तसेच लुटमारीचे प्रकार हे गुंड प्रवृत्तीचे युवक करीत असल्याचे यावेळी समोर आले होते. या उच्छादाल कंटाळलेल्या ग्रास्थांनी या युवकांना पकडून चांगलाच चोप दिला होता. विशेष म्हणजे या प्रकाराचा विडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी बोरगावमंजू पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मात्र, तेव्हा पासून ते युवक फरार होते. हे गुन्हेगार फरार असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातारण तयार झाले होते. नागरिकांना दहशतीतून बाहेर काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अजय ठाकूर आणि किरण पांडे या दोन गुंडांना अटक करून शहरातील मुख्य मार्गावरून त्यांची धिंड काढली. यामुळे नागरिकांमधील भिती कमी होणार आहे.

गावकऱ्यांना मागित होते खंडणी
अजय ठाकूर आणि किरण पांडे हे दोन गुंड खंडणी मागणे, महिलांची छेड काढणे, पोलिस असल्याचा बनाव करीत लुटमार करणे असे अनेक प्रकार सर्रासपणे हे युवक करीत असल्याचे समोर आले आहे. या गुंडगिरीने पोलिस प्रशासनासमोर एक आव्हान उभे राहले होते. दरम्यान, शनिवारी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने यातील दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन शहरातून मिरवणूकच काढली. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत अर्थात कौतूक होत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख पोलिस निरीक्षक शैलष सपकाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

अनेकजण एलसीबीच्या रडारवर
जिल्ह्यासह देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच गुंड प्रवृत्तीचे लोक सर्वसामान्‍यांना त्रास देत आहेत. अशा त्रास देणाऱ्यांची यादी स्थानिक गुन्हे शाखेने तयार केली असून, आणखी काहीजण एलसीबीच्या रडारवर आहेत. विशेष म्हणजे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असाही इशारा स्थानिक गुन्हे शाखेने दिला आहे. 
 

loading image
go to top