esakal | कोरोना पॉझिटिव्हच्या चर्चेने उडवली झोप
sakal

बोलून बातमी शोधा

akola sleep blown up by Corona Positive's talk

शेजारी जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना दिसत असली तरी अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. मात्र, सोमवारी रात्री पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याच्या चर्चेला उत आला होता.

कोरोना पॉझिटिव्हच्या चर्चेने उडवली झोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 अकोला : शेजारी जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना दिसत असली तरी अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. मात्र, सोमवारी रात्री पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याच्या चर्चेला उत आला होता.

यामुळे अकोलेकरांची या बातमीने झोप उडवल्याचे चित्र होते. दरम्यान अधिकृत माहिती नसल्याने जिल्हा प्रशासन तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाकडून यासंदर्भात दुजोरा देण्यात आला नाही. मात्र, अफवा न पसरविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

सर्वोपचार रुग्णालयातून तपासणीसाठी पाठविलेल्या १२२ जणांच्या नमुन्यांपैकी ६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ६० जणांचे प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह आरोग्य विभागाला प्रलंबित अहवालांची प्रतिक्षा आहे. अशातच जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याच्या चर्चेला सोमवारी रात्री ऊत आला होता.

मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. श्यामकुमार सिरसाम यांनी सांगितले. तर बाधित रुग्णासंदर्भातील कोणताही अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आलेला नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडून कळविण्यात आले.

loading image
go to top