कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या घरात घुसला चोर, मग पहा काय झाले?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

अकोल्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याचे घर फोडून चोरानी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.८) सकाळी उघडकीस आला आहे. सगळीकडे कोरोनाची प्रचंड दहशत असताना चोराने थेट कोरोना रुग्णाच्या घरीच चोरी केल्याने अकोल्यात खळबळ उडाली आहे.  

अकोला : अकोल्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याचे घर फोडून चोरानी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.८) सकाळी उघडकीस आला आहे. सगळीकडे कोरोनाची प्रचंड दहशत असताना चोराने थेट कोरोना रुग्णाच्या घरीच चोरी केल्याने अकोल्यात खळबळ उडाली आहे.  

अकोल्यात मंगळवारी कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. अकोल्यातील मोहमद अली रोडवरील बैदपुरा भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी तपासणीत स्पष्ट झाले होते. हा रुग्ण व्यवसायानिमित्त दिल्लीला जाऊन आला होता असे कळते. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर घरातील अन्य ९ सदस्य रुग्णालयात दाखल झाले. त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधिताचे बैदपुरा भागातील घर काल बंदच होते. कोरोनाग्रस्ताच्या घरात चोरी झाल्याने पोलिसांनाही तातडीने पंचनामा करणे शक्य झाले नाही.

घर आधी सॅनिटाइझ करून त्यानंतरच घरात पंचनामा केला जाणार आहे. महापालिकेचे अधिकारी आता या भागात दाखल झाले असून, या संपूर्ण भागातही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. तसेच कोरोना रुग्णाच्या घरीही निर्जंतुकीकरण केल्यानंतर चोरीचा पंचनामा केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola theft in a Corona-positive patient's home