बहिणीमध्ये झाला मोबाइलवरून वाद, एकीने घेतली चक्क विहिरीत उडी, मग...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउनमध्ये मोबाइलचे वेड जरा जास्तच वाढले आहे. अशातच दोन बहिणींमध्ये मोबाइलवरून वाद झाला आणि एकीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

अकोला : लॉकडाउनमध्ये मोबाइलचे वेड जरा जास्तच वाढले आहे. अशातच दोन बहिणींमध्ये मोबाइलवरून वाद झाला आणि एकीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

ही रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या गड्डम प्लॉट येथे गुरूवारी (ता.21) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

चंद्रकांत बाबूराव वैधेवार यांच्या तक्रारीनुसार गड्डम प्लॉटमध्ये नानोटी यांच्या वाड्यात भाड्याने ते कुटूंबासोबत राहतात. त्यांची नात हर्षदा अनिल गिरधर (वय १९) ही घरातील कामे करीत नाही. म्हणून तिला तिची आई बोलली. सोबतच दोन बहिणींमध्ये मोबाइलवरून वाद झाला. या रागाच्या भरात हर्षदा गिरधर हिने वाड्यातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे कुटूंबावर शोककळा पसरली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola There was an argument between the sisters over the mobile, one of them jumped into the well, then 

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: