सावध रहा! तुमच्या महागड्या मोबाईलवर आहे चोरट्यांचे लक्ष

भगवान वानखेडे 
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे. मात्र, याच मोबाईलवर भुरटे चोर नजर ठेवून ते लंपास करत आहेत. सिटी कोतवाली पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मुख्य बाजारपेठेत मागील चार दिवसात अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तेव्हा भुरटे चोर मस्तपैकी महागडे मोबाईल फस्त करत असून सर्वसामान्यांना हा फटका बसत आहे.

अकोला : सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे. मात्र, याच मोबाईलवर भुरटे चोर नजर ठेवून ते लंपास करत आहेत. सिटी कोतवाली पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मुख्य बाजारपेठेत मागील चार दिवसात अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तेव्हा भुरटे चोर मस्तपैकी महागडे मोबाईल फस्त करत असून सर्वसामान्यांना हा फटका बसत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधी रोडवर सर्वसामान्य खरेदी करण्यासाठी येत असतात. यावेळी याच सर्वसामान्यांवर पाळत ठेवून असलेल्या भुरटे चोरांचे फावले आहे. हे भुरटे चोर वयोवृद्धांची कधी फसवणूक करून तर कधी नजरचूक करून त्यांच्याकडे सामान वस्तू आणि मोबाइल चोरून नेत आहेत. मागील चार दिवसात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात जवळपास अशा असंख्य प्रकारचे दाखल झाले असून पोलिसांनी तक्रारी नोंदविल्या आणि शोध सुरू केला आहे. मात्र हे मोबाईल मिळतीलच याची शाश्वती कोणाला देण्यात आलेले नाही हे विशेष.

यांचे गेले मोबाईल
संतोष कुमार कन्हैयालाल धिंग्रा यांचा आरिफ बूट हाऊस या दुकानातून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल तर आरती सुरेश कोल्हे या वानखेडे नगर येथील रहिवासी असलेल्या शिक्षिकेचा 30 जानेवारी रोजी ब्रँडेड कंपनीचा मोबाइल सोबतच जुने बस स्थानक येथून 56 वर्ष वय असलेल्या सुरेश श्रीराम गोरड यांचा याच दिवशी सायंकाळी चार वाजता आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि कोथळी बाजार येथून माधव विष्णू ठाकरे या युवकाचा 24 जानेवारी रोजी तर दीपक सिंह प्रकाश सिंह किल्लेदार यांचा गांधी चौकातून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि गौरव रवींद्र पाटोदकर यांचा 26 जानेवारी रोजी सराफा बाजार मधून मोबाईल लंपास झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

खरेदीसाठी येत आहे तर सावध राहा
खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांनी आपल्याकडील वस्तू पैसे मोबाईल याची काळजी आपणच घेऊन त्या चोरीला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आव्हान सिटी कोतवाली पोलिसांनी केली आहे.

नंबर क्रश करून चोरीचा मोबाइलची विक्री
सर्वसामान्यांकडून चोरलेला मोबाईलचा ईएमआय नंबर क्रॅश करून तो पुन्हा नव्याने तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. सिटी कोतवाली परिसरात अशी एक टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलीसही नाकारत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola thieves' attention is on your expensive mobile