Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाचा तडाखा वाढणार; पारा पंचेचाळिशी पार करणार, अकोला राज्यात ‘हॉट’ नागपूरचा पारा ४१.१ अंशावर
Nagpur Temperature : विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट जाणवणार असून, पारा पंचेचाळिशी पार जाण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला परिसरात उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे.
नागपूर : अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होत असल्याने व उष्णलाटेसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे विदर्भात पुन्हा सूर्य आग ओकणार आहे. त्यामुळे या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढून पारा पंचेचाळिशी पार जाण्याची दाट शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.