‘टीसी’साठी शाळेत माेजावे लागतात पाचशे रुपये

याेगेश फरपट
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुख्याध्यापकांच्या कक्षातच पालकांचा ठिय्या, डिजिटल शाळेसाठी गरीब पालकांकडून पठाणी वसूली
अकोला - एकीकडे शिक्षणाच्या संधी गाेरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांना उपलब्ध हाेण्यासाठी सरकार सर्व शिक्षा अभियान व प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक कार्यक्रम राबविला जात आहे. काेट्यवधी रूपयांचा निधी यावर खर्च हाेत असतांना जिल्ह्यातील चांदूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाचशे रूपयात शाळा साेडण्याच्या दाखल्यासाठी पाचशे रूपयाची पठाणी वसूली शिक्षकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे गावातीलच एका शाळेत प्रवेशाविनाच तीस ते पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव आहे.

अकाेला तालुक्यातील चांदूर येथे जिल्हा परिषदेची वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी इयत्ता आठवीपर्यंत वर्ग आहेत. अाठवीनंतर विद्यार्थी आपल्या साेईनुसार पुढील माध्यमिक शिक्षण घेतात. गावातच पुंडलीकबाबा विद्यालय सुद्धा आहे. गावातीलच ही शाळा साेईचे असल्याने याठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्यावर्षी इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने शाळा साेडण्याचा दाखला दिला नाही. शाळा साेडण्याचा दाखला देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडून पाचशे रूपयाची मागणी करीत असल्याचे पालकांनी सांगितले. मंगळवारी (ता.१२) पालकांनी मुख्याध्यापकांच्या कक्षातच टीसी मिळण्यासाठी तीन तास ठिय्या दिला.

शाळा समिती सदस्यांची धाव
दरम्यान मुख्याध्यापक दिलीप अंधारे हे रजेवर असल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे शाळा समिती सदस्यांनी प्रकरण हाताळण्यासाठी धाव घेतली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते प्रकाश रेड्डी व पालकांशी त्यांनी संवाद साधला. शाळा समितीचा ठराव झाल्यानुसार आम्ही पाचशे रूपये टिसीसाठी घेत असल्याची माहिती दिली. मात्र ठरावाची प्रत पालकांना दाखवण्यास असमर्थता दर्शवली.

काेण काय म्हणाले ..
जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकाराची दखल घेवून गरिब पालकांना मुलांचा शाळा साेडण्याचा मिळवून न दिल्यास शाळेसमाेर पालकांसह तीव्र आंदाेलन छेडण्यात येईल. - निकिता रेड्डी, सदस्य, जिल्हा परिषद, अकाेला

मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेवू नये म्हणून त्यांना विना टीसी शाळेत प्रवेश दिला. त्यांचे पालक टीसी मिळवण्यासाठी प्रयत्न करीतच आहेत. - पुष्पाताई गुलवाडे, माजी नगरसेविका तथा संस्थाध्यक्ष, पुंडलीक बाबा विद्यालय, अकाेला

शाळा सुधार समितीने घेतलेल्या ठरावानुसार देणगी घेतल्या जाते. आम्ही काेणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्काची वसूली करीत नाही. आज टीसीसाठी अर्ज आलेत. मी सुटीवर असल्याने आज त्याबाबत निर्णय घेता आला नाही. उद्या अर्ज पाहून निश्चित याेग्य निर्णय घेवू.

- दिलीप अंधारे,

मुख्याध्यापक, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, चांदूर, ता. अकाेला
* मुख्याध्यापक दिलीप अंधारे यांच्याशी फाेनवरुन संपर्क करून शाळा साेडण्याच्या दाखल्यासाठी पैसे घेणे चुकीचे आहे असे सांगत त्या पालकांना दाखला देण्यात यावा अशी सूचना केली हाेती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. - - प्रकाश रेड्डी, भाजप कार्यकर्ते

Web Title: akola vidarbha news 500 rupees for TC