अंधश्रद्धा घालवा, देश बलवान बनवा - प्रा. श्याम मानव

याेगेश फरपट
मंगळवार, 20 जून 2017

अकाेला - आज आपण विज्ञान शिकलाे पण तर्कशुद्ध उत्तरे शाेधण्यात अपयशी ठरत आहाेत. वैज्ञानिक दृष्टीकाेण नाहिसा हाेत चालला आहे.

विद्यार्थी व युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकाेण रूजविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहाेत. स्वतः वैज्ञानीक दृष्टीकाेण जाेपासत समाजातील अंधश्रद्धा घालवून देश बलवान बनवण्याचा विडा समस्त युवकांनी उचलावा असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समीतीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले. 

अकाेला - आज आपण विज्ञान शिकलाे पण तर्कशुद्ध उत्तरे शाेधण्यात अपयशी ठरत आहाेत. वैज्ञानिक दृष्टीकाेण नाहिसा हाेत चालला आहे.

विद्यार्थी व युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकाेण रूजविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहाेत. स्वतः वैज्ञानीक दृष्टीकाेण जाेपासत समाजातील अंधश्रद्धा घालवून देश बलवान बनवण्याचा विडा समस्त युवकांनी उचलावा असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समीतीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले. 

मंगळवारी (ता.२०) ‘सकाळ’ अकाेला कार्यालयात आयाेजीत ‘काॅफी विथ सकाळ’मध्ये ते बाेलत हाेते. प्रा. श्याम मानव अकाेला आले असता त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचेसमवेत राज्य प्रवक्ता पुरूषाेत्तम आवारे पाटील, अकाेला जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे, बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख अशाेक घाटे उपस्थीत हाेते. अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकाेण रूजविणे हाेय. समाजातील कर्मकांडांवर प्रहार करीत अंधश्रध्दा निर्मुलन, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी प्रयत्न यासह संघटनात्मक बांधणी सुरू आहे. युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. वैज्ञानिक दृष्टीकाेण ठेवून प्रत्येक युवकाने परिवर्तनासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे.

ग्रामिण युवक असाे की शहरी आज प्रत्येक युवक आवाक्याबाहेरील स्वप्ने पाहत आहेत. त्याच्या आकांक्षा वाढल्या आहेत. आधीची परिस्थिती वेगळी हाेती आज परिस्थिती बदलली आहे. पुर्वी पदवी मिळाली की नाेकरी लागायची पण आज हुशारीसाेबत व्यक्तीमत्व विकासाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वप्ने वाढली तेवढीच रिस्क वाढली. राेजगाराची भिषण समस्या समाेर असतांना आपला देश परदेशातून माल आयात करीत आहे.

उद्याेग, शेती, सरकारी यंत्रणेत नाेकरीच्या संधी संंपुष्टात येत आहेत. एखाद्या स्वप्नपुर्तीसाठी प्रयत्न करीत असतांना अपयश जर आले तर प्रचंड निराशा येते. त्यातून जी प्रतिक्रीया उमटते, ती त्या संबधीत युवकासाठी व समाजासाठी घातक ठरत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून युवकांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी, युवकांना वैज्ञानीक दृष्टीकाेण देण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती आगामी काळात काम करणार आहे. प्रश्न जरूर पडली पाहीजेत पण त्याचे ‘साेल्यूशन’ सुध्दा काढता आले पाहिजे. ज्याला हे जमते ताेच युवक आयुष्‍यात यशस्वी हाेवू शकताे. ज्या युपाेरीय देशांनी विज्ञानाची कास धरली. आज ते देश जगावर हुकूमत गाजवत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टीकाेण जाेपासून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात हातभार लावावा असे आवाहन प्रा. श्याम मानव यांनी केले. 

दृष्टीक्षेपात ॲक्शन प्लॅन
१. शाळा, महाविद्यालयामध्ये जाणिवजागृती
२. गाव, तहसील स्तरावर भरीव संघटन
३. सरकारी यंत्रणेच्या मदतीने गावाेगावी अंधश्रद्धा निर्मुलनच्या कार्यशाळा 
४. एनएसएस, एनसीसीला साेबत घेवून जनजागरण करणार

Web Title: akola vidarbha news shyam manav talking in coffee with sakal