esakal | मंगरुळपीर येथे एकाच दिवशी १० पॉझेटिव्ह, तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
sakal

बोलून बातमी शोधा

akola washim 10 positive, three days public curfew on the same day at Mangrulpeer

तीन महिन्यांपासून तालुक्यासह शहरात कोरोना बाधित रुग्ण एक किंवा दोन होते. मात्र एका आठवड्यात शहरात आठ रुग्ण झाले आणि १० जुलै रोजी एकाच दिवशी १० रुग्णाची भर पडल्याने आता एकूण रुग्ण संख्या २० वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अजूनही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मंगरुळपिर शहरातील व्यापाऱ्यांनी तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली.

मंगरुळपीर येथे एकाच दिवशी १० पॉझेटिव्ह, तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

sakal_logo
By
शरद येवले

मंगरुळपीर (जि.वाशीम) ः तीन महिन्यांपासून तालुक्यासह शहरात कोरोना बाधित रुग्ण एक किंवा दोन होते. मात्र एका आठवड्यात शहरात आठ रुग्ण झाले आणि १० जुलै रोजी एकाच दिवशी १० रुग्णाची भर पडल्याने आता एकूण रुग्ण संख्या २० वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अजूनही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मंगरुळपिर शहरातील व्यापाऱ्यांनी तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली.


मंगरुळपीर शहरात गेल्या आठच दिवसात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, प्रत्येक दिवशी एक किंवा दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र, शुक्रवारी एकाच दिवशी दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आणि जनतेने स्वयंस्पुर्तीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. अजून १७ संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी असून, पॉझिटिव्ह आलेल्या रग्णांच्या संपर्कात आलेल्याचे नमुने घेणे व त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करणे सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले होते. याचा सकारात्मक परिणाम सुद्धा नागरिकांना झाला होता. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होताच जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासन शोध घेत आहे. परंतु आता मात्र लोक नियमांचे उल्लंघन करून गर्दी करीत असल्याने ही धोक्याची घंटा वाजली आणि त्याचा परिणाम काय झाला हे आता शहरातील नागरिकांना कळताच त्यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु तब्बल एक आठवड्याचा जनता कर्फ्यू आणि कर्फ्यू शिथील होताच पुन्हा एकदा कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

(संपादन - विवेक मेतकर)