esakal | जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रे बंद, कृषी संचालकांचा संप; शेतकऱ्यांची मोठी कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

akola washim Agriculture service centers closed in the district, strike of agriculture directors; A big dilemma for farmers

जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी ५ जुलै रोजी वाशीम येथे बैठकीत कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना चागलाच त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रे बंद, कृषी संचालकांचा संप; शेतकऱ्यांची मोठी कोंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मंगरुळपीर (जि.वाशीम) ः जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी ५ जुलै रोजी वाशीम येथे बैठकीत कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना चागलाच त्रास सहन करावा लागत आहे.
काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगविले नाही म्हणून त्यांनी थेट कृषिसेवा केंद्राच्या संचालकाना दोषी ठरवून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटाच लावल्याने व यामध्ये कृषिसेवा संचालकांचा काहीच दोष नसतांना त्यांनाच दोषी ठरवून त्यांच्या नावाने तक्रारी करण्यात येत असल्याने ५ जुलै रोजी वाशीम जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा संघटनेचे पदाधिकऱ्याची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कृषिसेवा संचालकांनी ६ जुलै पासून आपली दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी मंगरुळपीर तालुक्यातील सर्व कृषिसेवा केंद्रे बंद होती. परंतु याबाबींचा फटका इतर शेतकऱ्यांना बसत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नेमकेच शेतातील पिके थोडी मोठी झाली असून, त्यांना रासायनिक खते, औषधे व ईतरही कृषी मालासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कृषिसेवा केंद्राचे संचालक थेट कम्पनीतून माल आणून त्याची विक्री करतात मग एकट दुखट शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगविले नाही तर व ज्यांच्या शेतातील बियाणे उगविले असेही सरळ कृषी विभागात तक्रारी करीत आहेत. याबाबी साठी काही वैज्ञानिक कारणेही असून प्रर्जन्यमान कमी जास्त होणे, पेरणी लवकर करणे, घरगूती बियाणे वापरणे, ट्रॅक्टर ने खोल पेरणी करणे असेही कारणे यास कारणीभूत आहेत मात्र कुठलीही शहानिशा न करता दुकानदाराच्या विरोधात तक्रारी होत असल्याने शेवटी कृषी सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लवकर तोडगा काढावा
जोपर्यंत शासन ठोस उपाययोजना करीत नाही तो पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे येथील कृषिसेवा संचालकानी सांगितले आहे. परंतु यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल होत असून शासनाने यावर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

loading image