
सोमवारी सकाळ...विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची लगबग...रस्त्याने पाण्याचे लोट वाहत आहे...अन्...हे काय पाहतापाहता दुचाकी थेट पाण्यात बुडाली...दुचाकीला जलसमाधी मिळाली अन्...त्यावर स्वार पालक व विद्यार्थिनी जखमी झाली. ही घटना आहे अकोला शहाराच्या मध्यवर्ती भागातून तयार होत असलेल्या उड्डाण पुलाजवळील टॉवर चौकातील.
अकोला : सोमवारी सकाळ...विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची लगबग...रस्त्याने पाण्याचे लोट वाहत आहे...अन्...हे काय पाहतापाहता दुचाकी थेट पाण्यात बुडाली...दुचाकीला जलसमाधी मिळाली अन्...त्यावर स्वार पालक व विद्यार्थिनी जखमी झाली. ही घटना आहे अकोला शहाराच्या मध्यवर्ती भागातून तयार होत असलेल्या उड्डाण पुलाजवळील टॉवर चौकातील.
अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात जेल चौक ते अकोला क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर टॉवर चौकात सुरू असलेल्या कामात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा फटका सोमवारी एका करी विद्यार्थिनीसह तिच्या पालकाला बसला. खोदकामात जलवाहिनी फुटलल्याने पडलेल्या खड्ड्यात दुचाकी पडली.
बघताबघता खड्ड्याच्या पाण्यात दुचाकी बुडाली. त्यात दोघेही जखमी झाले. त्यांना आजुबाजूच्या लोकांनी तातडीने मदत केल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. पालक विद्यार्थिनीला कार्मेल कॉन्व्हेटमध्ये सोडण्यासाठी जात होते. या घटनेनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनातर्फे जलवाहिनी दुरुस्ती करून खड्डा बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
हजारो लिटर पाणी वाहून गेले
उड्डाण पुलाच्या कामातील निष्काळजीपणाचा फटका अकोलेकरांना सातत्याने बसत आला आहे. यापूर्वी दोघांना याच उड्डाण पुलाच्या कामामुळे प्राणास मुकावे लागले होते. त्यानंतरी कामात कुठलेच नियोजन होताना दिसत नाही. परिणामी सोमवारी पुन्हा एकदा खोदकामात जलवाहिनी फुटली. त्यासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडून जखमी झाले. या जलवाहिनीतून हजारो लिटर शुद्ध पाणी वाहून केले. त्यामुळे काही काळासाठी वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.
मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष
महापालिका प्रशासनातर्फे उड्डाण पुलाच्या कामाबाबत कोणतेही गांभिर्य घेतले जात नसल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. त्यामुळे कंत्राटदाराचे चांगलेच फावत असून, त्यांनी नागरिकांना अडचणी जाणार नाही याबाबत कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. परिणामी या कामामुळे अशोक वाटिका ते टॉवर चौकापर्यंत वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.
दुरुस्तीचे काम सुरू
जलवाहिनी फुटल्यामुळे महापालिकेने खोदलेल्या खड्ड्यात एका दुचाकीला जलसमाधी मिळाल्याची घटना सोमवारी घडली. त्यानंतर महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे व खड्डा बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने खड्डा बुजविण्याचे काम सुरू होते.