coronavirus:दोन दिवसात नऊ चाचण्या, आठ निगेटीव्ह, एक अहवाल प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

जिल्ह्यात रविवारअखेरपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गेल्या दोन दिवसांत (ता.21 व 22) विदेशातून आलेल्या नऊ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एकाच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

अकोला : जिल्ह्यात रविवारअखेरपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गेल्या दोन दिवसांत (ता.21 व 22) विदेशातून आलेल्या नऊ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एकाच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

 

जिल्ह्यात रविवारअखेर (ता.22) 78 व्यक्ती विदेशातून आले. त्यातील 77 जणांशी प्रशासनाने संपर्क केला आहे. पैकी 44 जणांना खबरदारी म्हणून गृह अलगीकरण करून निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. रविवारी सकाळी दाखल झालेल्या एका व्यक्तीस जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गृह अलगीकरणात असलेल्या 32 जणांचे 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तीन नवे संशयीत आढळले
रविवारी तीन नवे संशयित समोर आल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. गत दोन दिवसांपासून पुणे-मुंबईसह देशातील इतर शहरातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रविवारपर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात ७११ देशांतर्गत प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशातच तीन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अशी आहे कोरोना संशयीत रुग्णांची स्थिती
  विदेशातून आलेले - 78
  प्रशासनाच्या संपर्कातील - 77
  गृह अलगीकरणातील - 44
  कोरोना पॉझिटिव्ह - 00
  कोरोना निगेटिव्ह - 08
  अहवाल प्रलंबित - 01
  गृह अलगीकरणातून बाहेर - 32
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola:Nine tests, eight negatives, one report pending in two days