अकोल्याचा मृत्यूदर राज्याच्या दुप्पट!

_1585817273.jpg
_1585817273.jpg

अकोला  ः मागील काही दिवसांपासून अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याबरोबरच या पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असून, आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाने आत्महत्या केली आहे. एकीकडे राज्याचा मृत्यूदर तीन ते चार टक्के असताना दुसरीकडे मात्र, अकोल्यातील मृत्यूदर राज्यापेक्षा दुप्पट असून, आता राज्याचे लक्ष अकोल्याकडे लागले आहे.

शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. बुधवारी (ता.6) एकाच दिवशी चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर दिवसागणिक शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये आतापर्यंत 95 पॉझिटिव्ह अहवाल आले असून, सद्यस्थितीत 70 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाला हरवून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्याही समाधानकारक असली तरी रोज नव्याने वाढत असलेले रुग्ण या सकारात्मकतेला मारक ठरत आहेत. तेव्हा येत्या काही दिवसांत अकोला विदर्भातील कोरोनाचा नवे हॉटस्पॉट म्हणून उदयास येते की काय अशीही शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून गुरुवारी एकाच दिवशी 13 पॉझिटिव्ह अहवाल आले. आतापर्यंत ऐवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह अहवाल येण्याचीही ही पहिलीच वेळ असून, रोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

70 रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण वयस्क
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयांतील आयसोलेशन कक्षात सध्या एकूण 70 रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. यामध्ये 41 पुरुष, 28 महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 70 रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे वयस्क असून, तरुणांचे प्रमाण अत्यल्प आहे.

दहा व्हेंटिलेटर उपलब्ध
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सध्या 10 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ तीन ते चार रुग्णांनाच व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली आहे. मात्र, बहुतांश रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळच येत नसल्याचे सांगण्यात आले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com