esakal | अल्लू अर्जुनला अखेर वाघाने दिली हुलकावणी! वाचा नेमके काय
sakal

बोलून बातमी शोधा

allu-arjun

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस टिपेश्वर अभयारण्य हे पर्यटकांसाठी बंदच होते. अनलॉक दोनपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आले. त्यातही कोरोनासंबंभी नियमांचे अधीन राहूनच परवानगी आहे.

अल्लू अर्जुनला अखेर वाघाने दिली हुलकावणी! वाचा नेमके काय

sakal_logo
By
अरुण डोंगशनवार

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : हॉलिवूड असो, बॉलिवूड असो की टॉलिवूड. इथल्या अभिनेते आणि अभिनेत्रीविषयी जनसामान्यांमध्ये नेहमाच उत्सुकता असते. टॉलिवूडचे रजनीकांत तर सुपरहिरो आहेत. सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर कलाकारांनाही भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करीत तेलंगण राज्यातील प्रसिद्घ अभिनेता अल्लू अर्जुन पत्नीसह रविवारी (ता. १३) सकाळी तालुक्‍यातील टिपेश्वर अभयारण्यात आला व भेट देत त्यांनी जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी सुन्ना ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस टिपेश्वर अभयारण्य हे पर्यटकांसाठी बंदच होते. अनलॉक दोनपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आले. त्यातही कोरोनासंबंभी नियमांचे अधीन राहूनच परवानगी आहे. रविवारी सकाळी अभिनेता अल्लू अर्जुन हा आपली पत्नी स्वाती, तेलंगण राज्यातील वनाधिकारी व सुरक्षारक्षक असे दहा जण सकाळी सहाला टिपेश्वर अभयारण्याच्या सुन्ना गेटवर दाखल झाले.

सविस्तर वाचा - राजेश खन्ना हे खरे रोमँटिक सुपरस्टार

दरम्यान, तेलंगणातील अभिनेता टिपेश्वरची सफारी करायला आल्याची माहिती मिळताच गावातील तरुणांनी अल्लू अर्जुनच्या गाडी भोवती घोळका केला. अर्जुन याने गाडीच्या पायदानावर उभे राहून तरुणांना अभिवादन केले. त्यानंतर गाडी टिपेश्वरच्या गेटमध्ये गेली. जिप्सीमधून सर्वांनी टिपेश्वर अभयारण्याची सफारी केली. त्यांना वाघांचे दर्शन झाले नाही. काळवीट, हरिण व मोर यासाखरे वन्यप्राणी दिसले. पिलखान, टिपेश्वर लेक आदींसह सर्वच पॉइंट त्यांनी बघितले. तीन तासांच्या सफारीनंतर त्यांनी तेलंगणाचा रस्ता पकडला. उन्हाळ्यात पुन्हा येऊ, असे त्याने जिप्सीचालक चंदू मडावी याला सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार