अमरावती - अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना गुरुवारी (ता. १३) मिळाला. यामुळे गेले अनेक वर्षांचे हवाई वाहतुकीचे अमरावतीकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे..अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, अमरावतीकरांच्या स्वप्नाला पंख भरारीचे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले..या क्षणाची उत्कटतेने वाट बघणाऱ्या माझ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मनःपूर्वक अभिनंदन करतो..आपल्या प्रतिक्रियेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, गगनभरारी घेण्याचा अमरावतीकरांच्या स्वप्नातील क्षण आता जवळ आला. अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना आज मिळाला. येथून लवकरच जगभरात उड्डाण सुरू होतील..मार्च २०२५ च्या अखेरीस विमान वाहतूक सुरू होणार आहे. प्रवास, व्यवसाय, पर्यटन व उद्योगाला चालना मिळून जनतेच्या इच्छा आकांक्षांना प्रगतीचे पंख फुटतील. विकासाला कवेत घेऊन जगावर स्वार होणारे हे उड्डाण असेल..विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचा मुद्दा प्रलंबित होता. अनेकदा उड्डाणाच्या तारखांची घोषणासुद्धा झाली आहे. परंतु प्रत्यक्षात विमान कधी उडणार, असा प्रश्न करण्यात येत होता. अर्थसंकल्पात घोषणा झाल्यावरही कोणतीच शाश्वती नसल्याचे बोलल्या जात होते..त्याबाबतच्या चर्चादेखील जिल्ह्यात सुरू होत्या. परंतु आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) परवानगी मिळाल्याने उड्डाणाचा मार्ग सुकर झाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.