अमरावती - चालू आणि थकित मालमत्ता कर वसुलीसाठी महिनाभराचा अवधी शिल्लक असताना ८५ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. वसुलीसाठी शासकीय सुटीच्या दिवशी शिबिर आयोजित करण्यात येत असले व व्याजमाफीची सवलत देण्यात आली. तरी एकूण मागणीच्या तुलनेत गेल्या अकरा महिन्यात ६९ कोटींचीच वसुली झाली आहे. पैसाच येत नसल्याने त्याचा एकूणच परिणाम विकासकामे व दायित्वावर होऊ लागला आहे.