तब्बल पन्नास भूखंड विकून अमरावती महापालिका उभारणार विकास निधी

कृष्णा लोखंडे 
Friday, 27 November 2020

महापालिकेच्या ताब्यातील भूखंडांचा लिलाव करण्यात येणार आहे. तब्बल पन्नास भूखंड या लिलावात काढण्यात येणार असून त्या माध्यमातून येणाऱ्या पैशांतून विकास कामे करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. ले आउट झालेल्या अभिन्यासातील काही भूखंड विकासकाकडून महापालिकेकडे वर्ग करण्यात येतात. 

अमरावती ः महापालिकेच्या ताब्यातील भूखंडांचा लिलाव करण्यात येणार आहे. तब्बल पन्नास भूखंड या लिलावात काढण्यात येणार असून त्या माध्यमातून येणाऱ्या पैशांतून विकास कामे करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. ले आउट झालेल्या अभिन्यासातील काही भूखंड विकासकाकडून महापालिकेकडे वर्ग करण्यात येतात. 

या भूखंडाचा लिलाव करून त्या माध्यमातून येणाऱ्या पैशांतून विकास कामे केल्या जातात. सद्यःस्थितीत महापालिकेकडे असे बऱ्याच अभिन्यासातील भूखंड असून त्यावर अतिक्रमण होण्याची शक्‍यता अधिक आहे. याशिवाय काही नागरिकांकडून मागणी केल्या जाते. त्यासाठी राजकीय दबावतंत्राचाही उपयोग केल्या जातो, असा अनुभव आहे. 

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

आता असे भूखंड लिलावात काढण्याचे आदेश आयुक्तांनी नगररचना विभागास दिले आहेत. हे सर्व भूखंड टप्प्याटप्प्याने लिलाव करण्यात येणार आहेत.

भूखंडाच्या लिलावातून येणाऱ्या पैशांतून विकास कामांसाठी लागणारा निधी उभा केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील अधिक मागणी असलेल्या भागातील अभिन्यासातील भूखंड लिलावात काढण्यात येणार आहेत. पन्नास भूखंडांची यादी त्यासाठी तयार करण्यात येत असून तीन ते चार टप्प्यात लिलाव करण्यात येणार आहे, असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amaravati NMC will sell 50 plots for development fund