

Vidarbha News
esakal
आमगाव: एकीकडे भारतीय रेल्वे ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा गाजावाजा करीत असताना, आमगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या नशिबी अक्षरशः हालअपेष्टा आल्या आहेत. तब्बल आठ कोटी खर्चून विकसित केलेल्या या स्थानकावरील मूलभूत सुविधांचाच बोजवारा उडाल्याने हा विकास केवळ देखावा ठरल्याची तीव्र भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.