अमरावती: शहरात पुन्हा चेनस्नॅचरचा धुमाकूळ सुरू झाला आहे. गाडगेनगरहद्दीत अर्जुननगर चौकामध्ये एका महिलेच्या गळ्यातील एक लाख ७० हजार रुपये किंमतीचे १८ ग्रॅमचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले..महिलेला (वय ३६) २०२५ मध्ये सासरच्या मंडळींनी १८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र दिले होते. मंगळसूत्र घालून सदर महिला ही नियमित तिच्या कार्यालयामध्ये दुचाकीने येणे-जाणे करते. परंतु महिलेची दुचाकी बिघडल्याने नातेवाइकाने तिला कार्यालयापर्यंत दुचाकीने पोहोचवून दिले..Amravati: फ्रेजरपुरा हादरला! १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; अमरावतीत खळबळजनक घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण.सायंकाळी सदर महिला कर्मचारी ही पायदळ पंचवटी चौकातून पुढे दुचाकीने घराकडे निघाली. सहा वाजताच्या सुमारास घरी जात असताना अर्जुननगर चौक ते जीवेश्वर मंदिराच्या फलकाजवळ महिलेच्या समोरून एका दुचाकीवर दोन युवक आले..महिलेच्या अंगावर दुचाकी आणली. महिलेने दुचाकीस्वारास त्यासंदर्भात जाब विचारला असता, त्यापैकी मागे असलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील एक लाख ८० हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला..Premium|Oil Crisis India : भारतामध्ये तेलाच्या किमती इतक्या प्रचंड वेगाने का वाढतायेत? आतापर्यंतच्या तेलाच्या संकटांवर आपण कशाप्रकारे मात केली आहे? .महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार वेगाने निघून गेले होते. पीडित महिलेने गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दोन अनोळखी दुचाकीस्वारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.