

Banana farmers in Amravati face pricing uncertainty amid drought and declining demand for tissue culture plants.
esakal
पथ्रोट (जि. अमरावती) : केळी कटाईवरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर केळीचे दर जाहीर करणे बंद करण्यात आले. त्यामुळे बाजारातील भावफलकावरून केळीचे दर गायब झाले असून, व्यापारी मनमानी पद्धतीने खरेदी करीत आहेत. योग्य भाव कोणता, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविल्याने टिशू कल्चर रोपांचे दरही निम्म्यावर आले आहेत.