Amravati Accident : अमरावतीत बांधकाम सुरू असतानाच मोठी दुर्घटना! प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून चार मजूर मलब्याखाली दबले; अग्निशमन दलाने केले तातडीने बचावकार्य

Amravati Construction Accident: अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात निर्माणाधीन प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून चार मजूर जखमी झाले. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मजुरांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Amravati Construction Accident

Amravati Construction Accident

esakal

Updated on: 

अमरावती : निर्माणाधीन प्रवेशद्वाराचे छत बांधकामादरम्यान कोसळल्याने मलब्याखाली दबून चार जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. १०) सायंकाळी अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात घडली. अग्नीशमन दल व स्थानिकांच्या मदतीने चौघांना तातडीने मलब्याबाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सात, कृष्णानगर-रामपुरी कॅम्प येथे साई सचूराम दरबार असून, त्या दरबाराच्या मार्गावर २० बाय २२ फूट आकाराच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. गणपती उत्सवादरम्यान या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन झाले. आगामी गुरूनानक जयंतीपर्यंत (२४ नोव्हेंबर) ते पूर्ण करायचे होते. त्यामुळे काम जलदगतीने सुरू होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या कामाचे कंत्राट जाकीर नामक कंत्राटदाराकडे होते. त्याने या कामावर दहा मजूर लावले होते.

Loading content, please wait...