

Amravati Drought
esakal
अमरावती : पीकपरिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करण्यास सुरवात करण्यात आली असून २०१७ व २०१८ मध्ये ज्याप्रकारे निर्णय घेण्यात आले, त्यापद्धतीने यावेळीही निर्णय घेणे गरजेचे आहे. पाऊस चिंतेचा विषय असून लवकरच दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय होईल, असे आश्वासन महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता. १९) तिवसा येथे दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी तसेच मदत व पुनर्वसन मंत्र्यांसह आम्ही सर्व मंत्री अहवाल मांडणार आहोत.