Namo Shetkari Yojana Latest Update
esakal
अमरावती : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा ३० ऑक्टोबरला २४ वा हप्ता वितरित झाला. पण, राज्य सरकारकडे तीन हप्ते थकले आहेत. जिल्ह्यातील दोन लाख ८३ हजार ८५ शेतकऱ्यांना अख्ख्या वर्षभरात एकही हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर राज्य शासनाकडून मीठ चोळण्यात येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.दरम्यान, स्थानिक कृषी विभागाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली असली तरी त्यांनाही प्रतिसाद मिळालेला नाही.