

Amravati Fraud
sakal
अमरावती : स्वत:ला मोठा बांधकाम व्यावसायिक व बिल्डर असल्याचे खोटे चित्र भासवून शहरातील मायलेकीची एक कोटी ५१ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. राजापेठ ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत हरगोविंद कलंत्री (वय ४०, रा. अमरावती), असे फसवणूक व विश्वासघातप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती राजापेठचे पोलिस निरीक्षक पुनीत कुलट यांनी दिली.