Amravati: जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाळपोळ

अमरावती : जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात निदर्शने व बंदच्या आवाहनानंतर उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनंतर दोन दिवसांमध्ये ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. सोशल मीडियावरील हिंसाचाराची चौकशी होईल, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्तालयाच्या हद्दीत जाळपोळ, दगडफेकीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली. डॉ. राजेंद्र सिंह यांनी प्रथमच आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह उपस्थित होत्या. दरम्यान, समाजात तेढ निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणाऱ्या चौघांच्या विरोधात लातूर व उदगीर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे नोंद करण्यात आले.

loading image
go to top