

Massive Fire at Habib Nagar in Amravati; Scrap Warehouse and Five Houses Damaged
esakal
अमरावती : शहरातील वलगाव मार्गावर गजबजलेल्या हबीब नगर परिसरात एकाच वेळी स्क्रॅपच्या गोदामासह पाच घरांना भीषण आग लागली आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवार १८ नोव्हेंबरला दुपारी तीनच्या सुमाराची घटना घडल्याने चांगलीच तारांबळ उडाली. आगीमध्ये एका घरातील एक लाख रुपयांची रोख रक्कम व इतर साहित्य आगीत भस्मसात झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.